![]() |
मुक्ताईनगर येथील प्रारंभिक अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन एव महिला अपराध नियंत्रण शाखा ची सभा उत्साहात संपन्न. |
संदीप जोगी... मुक्ताईनगर
येथील प्रारंभिक अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन एव महिला अपराध नियंत्रण शाखा मुक्ताईनगर , याची 7 वी सभा एक ऑक्टोंबर रोजी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्राम गृह येथे संपन्न झाली. बैठक जिला अध्यक्ष मोहन मेढे यांचा अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यात खाली विषय घेण्यात आले 1) संघटनेचे सचिव यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवले व ते कायम करण्यात आले.
2)हकीम आर चौधरी यांना आदर्श समाज रत्न, सम्मान मिळाल्याबद्दल संगठन चे वतीने हकीम चौधरी यांचा जिला अध्यक्ष मोहन मेढे यांनी पुष्पहार करून सत्कार केला. ,3) नवीन सदस्य प्रारंभिक अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन चे आयडी कार्ड वाटप करण्यात आले.
सदर बैठकीत आर पी पाटिल सर, एन.जे शेजोडे, सौ.भारती लोखंडे , भास्कर मिस्त्री, चंद्रकांत रावये, राजेंद्र वानखेडे, जगदेव इंगले, सुपडू बोदडे, धनंजय सापधरे,.रविंद्र सिरसोदे, शिवाजी कठोरे, विजय खराटे, समाधान पाटिल सर आदि संघटनेचे पदाधिकारी हजर होते.