मलकापूर : बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर

Viral news live
By -
0
मलकापूर : बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर
मलकापूर : बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर

मलकापूर (जि. बुलढाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नायगाव फाट्यानजीक असलेल्या बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, आणखी एक तरुण गंभीर अवस्थेत उपचाराधीन आहे. गुरुवारी (दि. २५) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

मृतांमध्ये साजीदखान जलीलखान (२२)मुस्ताक खान जब्बार खान (३८) यांचा समावेश आहे. तर आरिफ खान बशिर खान (३८) हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिघेही मलकापूर शहरातील पारपेठ प्रभागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदर तरुण गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घरून बाहेर पडले होते. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास पंपावरील टाकीत गुदमरल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाली. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून, गंभीर अवस्थेतील आरिफखानला आयुष्यमान रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या माहितीनुसार, नायगाव फाट्यानजीकचा हा बायोडिझेल पंप गेल्या काही काळापासून बंद होता. अशा परिस्थितीत हे तरुण टाकीत नेमके का गेले होते, स्वच्छतेसाठी गेले होते की इतर काही कारण होते, याबाबत विविध शंका व्यक्त होत आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे.

Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*