मुक्ताईनगर येथे अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी उपोषण

Viral news live
By -
0
मुक्ताईनगर येथे अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी उपोषण
मुक्ताईनगर येथे अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी उपोषण 

संदीप जोगी मुक्ताईनगर.....
2 ऑक्टोंबर   दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर  जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील आदिवासी कोळी बांधव  संजय प्रल्हाद कांडेलकर हे आपल्या जमातीला न्याय मिळवून देण्याकरीता जमातीच्या रक्षणासाठी मुक्ताईनगर  येथे प्रवर्तन चौकामध्ये  बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत.
          जमातीचा प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्याकरता हे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे तरी समाज बांधवांना व महाराष्ट्रातील तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या सर्व समाज बांधवांना महिला भगिनींना एक कळकळीची विनंती करण्यात येते की संजय  कांडेलकर यांच्या  उपोषणाला जास्तीत जास्त संख्येने पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहून शासनावर प्रशासनावर दबाव निर्माण करावा व आपला न्याय हक्क आपल्या पदरात पाडून घ्यावा . मागिल वर्षी सुद्धा 26 दिवस अन्नत्याग उपोषण  करणारे   संजय  कांडेलकर सारखे लढाऊ माणसे जिद्दी कार्यकर्ता आपल्या समाजाकडे आहे याचा माझ्या सह माझ्या आदिवासी कोळी समाजाला गर्व आहे .
आदिवासी कोळी समाजाचा विजय असो असे
संजय कांडेलकर यांनी कळवलेले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)