किन्होळा व कोलारी गावात , शेतात जाण्यासाठी शेतमजुर , शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास

Viral news live
By -
0
किन्होळा व कोलारी गावात , शेतात जाण्यासाठी  शेतमजुर , शेतकऱ्यांचा जीवघेणा  प्रवास
किन्होळा व कोलारी गावात , शेतात जाण्यासाठी  शेतमजुर , शेतकऱ्यांचा जीवघेणा  प्रवास

पैनगंगा नदीवर पुल , बंधारा आवश्यक 


बुलडाणा : स्वतंत्र च्या काळापासून कोलारी हा गाव विविध समस्यातून  शेतकरी आणि नागरिक ग्रासित आहे  चिखली तालुक्यातील किन्होळा व कोलारी गावाला लागूनच पैनगंगा नदी आहे. नदीला पूल नसल्यामुळे दळणवळण आरोग्य शिक्षण बाजारपेठ शेतकरी वंचित आहे  दोन तिन वर्षापासुन नदीचे खोलीकरण झाले असून   नदिपात्र सात ते आठ फुट खोल झाले आहे नदिवर काही ठिकाणी  बंधारे बांधल्याने नदीपात्रात चार ते पाच फूट पाणी कायम वाहत राहते. त्यामुळे या वाहत्या पाण्यामधून शेतकरी व शेत मजुरांना आपला जीव धोक्यात घालून शेती करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

विविध अडचणी असल्याने  शेतीच्या मशागतीची काम वेळेवर  होत नाही.  त्याचे परिणाम शेती उत्पन्नावर  होऊन शेतकरी आर्थीक व मानसीक अडचणीत सापडला आहे. यामुळे , कोलारी , किन्होळा , ब्रम्हपुरी शिवारातील शेती करने अव‌घड होऊन बसले आहे.  बरेच  शेतकरी आपली शेती विक्रीच्या तयारीत आहेत आहेत.परंतु नेहमीच असलेली पूर परिस्थिती यामुळे या भागातील शेती खरेदी करण्यास ग्राहक सुद्धा मिळत नाही. 



  संकटात असलेला बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने प्राधान्याने स्मशानभूमीलगत पैनगंगा नदिवर पूल व बंधारा बांधून दिल्यास किन्होळा कोलारी गावकऱ्यांची  पीण्याच्या पाण्याची , शेती सिंचनाची व रस्त्याची  समस्या कायमची मिटणार आहे.  

स्वतंत्र प्राप्ती पासून आजपर्यंत असलेला हा महत्वाचा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. 

ब्रम्हपुरी शिवारातील शेतात जाण्यासाठी नदिवरील  बंधारे फोडून शेतकरी पाण्यातून  जाण्यासाठी जी धडपड करतात ती  धडपड  कायमची बंद झाली पाहिजेत.  पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्नही कायमचा दूर होईल.  लोक प्रतीनीधीनी प्राधान्याने सदर काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.


हे दोन्ही,  तिन्ही गाव दळणवळण , बाजारपेठ , आरोग्य , शैक्षणिक व शेती शिवार एकमेकावर अवलंबून असून आतापर्यंत कोणतीच सुविधा  मिळाली नाही नदीवर पूल आवश्यक असून सिंचनासाठी बंधारा ही आवश्यक आहे ....सामाजिक कार्यकर्ते जगदीश बाहेकर

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)