![]() |
अंतुर्ली येथून शेगाव व पुणे बस सुरू करण्याची मागणी |
संदीप जोगी .. मुक्ताईनगर ....
तालुक्यातील अंतुर्ली येथून शेगाव बस सुरू करण्यात यावी अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या भटक्या जमाती व विमुक्त जमाती विभागाच्या सेलने आज मुक्ताईनगर आगारप्रमुखांना दिलेला निवेदनाद्वारे केलेली आहे.काँग्रेसच्या भटक्या जाती जमाती व विमुक्त जमाती सेलचे प्रदेश सचिव अनिल वाडीले यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन आगार प्रमुख निलेश कलाल यांना देण्यात आले.
अंतुर्ली हा ग्रामीण भाग असून मुक्ताईनगर या शहरी भागातून दररोज पुणे मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर यासह विविध शहरांसाठी लांब पल्ल्याचे वाहने उपलब्ध आहेत मात्र ग्रामीण भागात एकही लांब पाल्याची बस उपलब्ध नाही. अंतुर्ली गावाजवळच इच्छापुर देवीचे हे एक तीर्थक्षेत्र आहे. अंतुर्ली येथून शेगाव बस सुरू केल्यास इच्छापूर् व शेगाव असे दोन तीर्थक्षेत्र एकमेकांशी जोडले जातील. येथून शेगाव साठी जाणारी बस ही अंतुर्ली, इच्छापुर, पूर्णाड फाटा, दोलारखेडा, कुऱ्हा,पिंपळगाव काळे, नांदुरा, शेगाव या मार्गाने सुरू करण्यात यावी जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना सरळ शेगाव जाता येईल. तसेच अंतुर्ली येथून छत्रपती संभाजी नगर मार्गे पुणे बस ही देखील लांब पल्ल्याची बस बोदवड, जामनेर, पहुर, सिल्लोड ,छत्रपती संभाजी नगर ,अहिल्या नगर पुणे असा बसचा मार्ग असावा अशीही मागणी करण्यात आलेली आहे. तसेच तालुक्यातील कुरा व अंतुर्ली भागातून येणाऱ्या व जाणाऱ्या बसेसने प्रत्येक फाट्यावर थांबा हा सक्तीचा करण्यात यावा. बऱ्याचदा प्रवासी व विद्यार्थी हे ऊन ,पाऊस वारा यामध्ये फाट्यावर ताटकळत उभे असताना गर्दीचे कारण सांगत बसेस थांबत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचे अतोनात नुकसान होत आहे.त्यामुळे प्रत्येक फाट्यावर बस थांबवण्यात यावी. तसेच ग्रामीण भागात अतिरिक्त बस फेऱ्या वाढवण्यात येऊन सदर बस फेऱ्या दिवाळीच्या सुट्टीत त्याच गावांना चालवण्यात याव्या अशी देखील मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
निवेदनावर अनिल वाडीले , संजय पाटील, काँग्रेस प्रा. सुभाष पाटील, शेख भैय्या शेख करीम, या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.