![]() |
TET परीक्षेत गैरप्रकार; 7,800 विद्यार्थ्यांना न्याय मिळावा – जनशक्ती विकास संघाची मागणी |
पुणे, दि. 29 सप्टेंबर 2025 –
जनशक्ती विकास संघ तर्फे महाराष्ट्र परिक्षा परिषदेचे अध्यक्ष यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले की, राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मध्ये काही गैरप्रकार झाल्यामुळे तब्बल 7,800 विद्यार्थी अडकलेले आहेत.
सदर विद्यार्थी निर्दोष असूनही, त्यांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 मध्ये सहभागी होण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पाच वर्षांपासून न्याय मिळत नसल्याने आता त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
निवेदनात जनशक्ती विकास संघाचे महा. प्रदेश अध्यक्ष सुफियान खान यांनी विनंती केली की, या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी द्यावी. अन्यथा त्यांचे भविष्य अंधकारमय होईल व त्यांच्या आयुष्यावर परिणाम होईल. त्यामुळे, Maha TET 2025 मध्ये या विद्यार्थ्यांना सामील करून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना संघाचे महा. प्रदेश अध्यक्ष सुफियान खान, पुणे शहर अध्यक्ष (कायदा आगाडी) ॲड. मोहम्मद वसीम, युवा नेते अक्षय बहिरट तसेच समाजसेवक अस्लम भाई उपस्थित होते.