शिवसेना उबाठा मलकापूर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या समोर अँग्री स्टॅकवर फार्मर आयडी नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणींचा वाचला पाढा.

Viral news live
By -
0
शिवसेना उबाठा मलकापूर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या समोर अँग्री स्टॅकवर फार्मर आयडी नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणींचा वाचला पाढा.
शिवसेना उबाठा मलकापूर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या समोर अँग्री स्टॅकवर फार्मर आयडी नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणींचा वाचला पाढा.
मलकापूर प्रतिनिधी : शिवसेना उबाठा मलकापूर तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटिल व शेतकर्यांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्या समोर अँग्री स्टॅकवर फार्मर आयडी नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणींचा पाढाच वाचला. सविस्तर असे की, मलकापूर तालुक्यामधे अँग्री स्टॅकमध्ये फार्मर आयडी नोंदणी करतांना प्रचंड अडचणी येत आहेत. याबाबत शिवसेना तालूका कार्यालयाला प्रचंड तक्रारी प्राप्त झालेल्या. त्यामधे प्रामुख्याने - शेतकर्‍याच्या विविध गट क्रमांच्या जमिनी अँग्री स्टॅकवर नोंदवता येत नसल्याने, शेतकरी नोंदणी करताना केवळ एकच जमीन स्वीकारली जाते त्यामुळे प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या आहेत. जसे की, शेतकर्‍यांकडे वेगवेगळ्या ठिकाणी अनेक (गट क्र.) असलेल्या जमिनी असतात. वरील तांत्रीक अडचणी मुळे इतर जमिन नोंदविता येत नाही. त्यामुळे सरकारी योजना फक्त एकाच जमिनी पुरत्या मर्यादित राहते “ज्या एका जमिनीची नोंदणी केली जाते, त्याच जमिनीवर सरकारी योजनेचा लाभ घेता येतो.” त्यामुळे इतर जमिनीवर या योजनांचा लाभ मिळू शकत नाही; महाडीबीटी पोर्टलवरिल लाभ घेण्यासाठी अँग्री स्टॅकची नोंद आवश्यक आहे. मात्र जर फक्त एकच जमीन अँग्री स्टॅकमध्ये दिसत असेल, तर इतर योजनांचा लाभ मिळत नाही; शेतकऱ्यांवर एका जमिनीच्या आधारावर योजनांचा लाभ देणे हे अन्याय कारक आहे. त्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे. शेतकऱ्यांना ईतर योजनांमध्ये अनुदान, विमा, आणि सवलती मिळतात. परंतु फक्त एका जमिनीच्या नोंदणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
अँग्री स्टॅकच्या च्या संकेत स्थळावर तांत्रिक दुरुस्ती केल्यास शेतकऱ्यांना सर्व जमिनी नोंदवता येतील त्याबाबत तत्काळ सुधारणा करणे गरजेचे आहेत. तसेच ७/१२ खाते उतारा संबंधित नोंदणी बाबात मलकापूर तहसील कार्यालयतील कर्मचार्‍यांमधे कामकरण्याची प्रचंड उदासिनता आहे, त्यामुळे बर्याच ७/१२ खाते उतार्‍यांमध्ये अजूनही आधीच्याच मालकाचे नाव नमुद असल्याणे नवीन मालकाला लाभ घेता येत नाही. असे प्रचंड उदाहरणे मलकापूर तालुक्यामध्ये आहेत, त्यामधे गणेश भगवान पाटील रा. धरणगाव, गणेश गोविंदा कहाते रा. हरसोडा, प्रशांत विजय भोलंकर रा. हिंगणा नागपुर या शेतकऱ्यांची नावे लिस्ट मध्ये सर्च होत नसल्याने फार्मर आयडी काढता येत नाही, कारण जुन्याच मालकाचे नाव दाखवत आहे. सदर कामे शासनाच्या नागरीकांच्या सनद मधे ७/१२ खाते उतारा नवीन नोंदनी करिता लागणारा अवधी दिलेला आहे. तहसील विभागाच्या हलगर्जीमुळे असंख्य शेतकरी फार्मर आयडी पासून वंचीत आहेत. 
तसेच श्रीमती सखुबाई गोविंदा सोनवणे रा. दसरखेड, रामेश्वर बाबुराव धाडे रा. नरवेल, दामोदर पांडुरंग भोलनकर रा. चिंचोल यांच्या सह अनेक लोकांचे काही महीण्या पासून फार्मर आयडी अप्रुवल पेंडिंग आहे. त्यामुळे त्यांना शासकिय योजनेंकरीता (ठिबक, स्पिंकलर साठी) अर्ज करता येत नाही.
वरील विषयांबाबत शिवसेने आक्रमक पवित्रा घेत निवासी जिल्हाधिकारी यांना गाठले व यांनी अधीनीस्त मलकापूर एस.डी.ओ. यांच्या मार्फत चौकशी करून तालूकयातील सर्व पेंडीग फार्मर आयडींचे अ‍ॅप्रुवल करावे व सदर तलाठी, मंडळ अधीकारी यांच्यावर योग्य कार्यवाही करावी असे निवेदन दिले आहे. असे तत्काळ न झाल्यास शिवसेना मलकापूर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याबबत तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगीतले निवेदन देते वेळी शिवसेने चे सुरेश बऱ्हाटे, राजेंद्र काजळे, गणेश सुशीर, समद कुरेशी, नंदूसिंग ठाकुर, निलेश जवरे यांच्या सह शिवसैनिक व शेतकरी उपस्तीत होते.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*