मलकापूर शहरात गुटख्याने भरलेली ओमनी कार जप्त – स्था.गु.शा.ची कारवाई

Viral news live
By -
0
मलकापूर शहरात गुटख्याने भरलेली ओमनी कार जप्त – स्था.गु.शा.ची कारवाई
मलकापूर शहरात गुटख्याने भरलेली ओमनी कार जप्त – स्था.गु.शा.ची कारवाई

मलकापूर (प्रतिनिधी) : मलकापूर शहरातील पारपेठ भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.18 सप्टेंबर) सापळा रचून गुटख्याने भरलेली ओमनी कार पकडली. या कारवाईत 6 लाख 58 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधीत पानमसाला यांच्या विक्री, वाहतूक व साठवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी विशेष आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.च्या पथकाने ही कारवाई केली.

गोपनीय माहितीच्या आधारे पारपेठ भागात सापळा रचून ओमनी (क्र. MH-02-AY-5056) वाहन अडवले असता चालकाच्या ताब्यातून सुगंधीत पानमसाला व गुटखा किंमत सुमारे 5 लाख 58 हजार 970 रुपये असा माल मिळून आला. वाहनासह एकूण 6 लाख 58 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी शेख यासीन शेख रहेमान (वय 44, रा. पारपेठ, मलकापूर) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भा.दं.सं. कलम 223, 274, 275, 123 सह अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 26, 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. पंकज सपकाळे, पोहेकॉ. एजाज खान, पोकॉ. अमोल शेजोळ, अजीज परसुवाले, विक्रांत इंगळे व चापोकॉ. शिवानंद हेलगे यांनी सहभाग घेतला.

Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*