![]() |
शिवसेना (उबाठा) च्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने विस वर्षांनंतर हरणखेड मध्ये आली लालपरी बस डफडे वाजवून ग्रामस्थांनी केले लालपरी चे थाटामाटात स्वागत |
शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांसह आगारव्यवस्थापक,बस चालक -वाहकाचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार
मलकापुर:- तब्बल विस वर्षापासून बंद असलेली ग्राम हरणखेड येथील बस शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक मुकुंद नाव्हकर यांना दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सुरू झाल्याने ग्रामस्थांनी शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता गावात आलेल्या लालपरी बस चे डफडे वाजवून फटाके फोडून जोरदार स्वागत केले.
मलकापुर तालुक्यातील ग्राम हरणखेड गावात विस वर्षांपासून रस्त्या अभावी एसटी बस येत नसल्याने गावातील ग्रामस्थ, महिला,वृद्धांना, विद्यार्थी विद्यार्थ्यांना एक किलोमीटर पायी जात बोदवड तालुक्यातील हरणखेड येथे जाऊन एसटीने प्रवास करावा लागत होता. याबाबतची माहिती हरणखेड येथील ग्रा.प सदस्य राजु नेवे,चिंचखेड चे अमोल निकम यांनी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना सांगितल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांसह आगारव्यवस्थापक मुकुंद नाव्हकर यांचे कार्यालय गाठून दि.26 जुलै 25 रोजी एका निवेदनाद्वारे हरणखेड बस सुरू करण्या संदर्भात आंदोलनचा इशारा दिला होता.दोन महिन्याच्या कालावधीत ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने रस्त्यावर येणारी झाडे - झुडपे तोडून,म.रा.वि.वि कंपनी कर्मचाऱ्यांकडून रस्त्यांत लोंबकळत असलेल्या तारा, सर्व्हिस वायरी वर करून,सां.बा विभाग मार्फत लेखी पत्र घेत विविध विभागांच्या कागदपत्रांची पूर्तता करून अखेर तब्बल विस वर्षांनंतर शुक्रवार दि.19 सप्टेंबर 25 रोजी सकाळी दहा वाजता लालपरी बस हरणखेड गावात आली. यावेळी ग्रामस्थांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहर प्रमुख हरीदास गणबास, किसानसेना तालुकाप्रमुख महादेव पवार,युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड, महादेव लटके, अविनाश सावळे,किसानसेना शहरप्रमुख सै.वसीम सै.रहीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी सह आगार व्यवस्थापक मुकुंद नाव्हकर, वरीष्ठ लिपिक प्रमोद अहेर,बस चालक आर.पी.कोळी,वाहक के.बि. शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पोलीस पाटील पुंजाजी वसतकार, कृ.उ.बा समिती उपसभापती नागो राणे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू नेवे,अमोल निकम, ईश्वर तायडे, संदीप खाचणे, विश्वास होले, जयंता मोरे, निलेश नाफडे, हरी निकम, सुरज राणे, संघर्ष तायडे, राहुल तायडे, साहेबराव निकम, स्वप्नील शेगोकार, अजय खाचणे, प्रतीक होले, सागर करांडे, वैभव करांडे,अनंत करांडे, बबन राणे, मिलिंद करांडे, लक्ष्मण खाचणे, सुनील खाचणे, हरी खाचणे, अशोक खाचणे, गजानन खाचणे, विश्वास होले, संदीप खाचणे, सुरज राणे, गजानन वसतकार, नितीन खाचणे, नारायण राणे, चेतन खाचणे सह हरणखेड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.हरणखेड बस सुरू झाल्याने ग्रामस्थांनी शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांचे आभार मानले!