![]() |
मोरखेड - दुधलगांव रस्त्याची दुरावस्था जिव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना जावे लागते शाळेत |
रस्त्यावरील नाल्यावर तात्काळ पुलाची मागणी अन्यथा विद्यार्थी व शेतकरी, ग्रामस्थांसह नाल्यातच आमरण उपोषणाचा शिवसेना (उबाठा) चा इशारा
मलकापुर:- तालुक्यातील ग्राम मोरखेड - दुधलगांव रस्त्याची दुरावस्था झाली असून मोरखेड येथील 121 विद्यार्थी-विद्यार्थीनी दुधलगांव येथील शाळेत शिक्षणासाठी ये-जा करतात मात्र या रस्त्यावरील मरीमाता मंदिराजवळ साठीचा नाला असून ग्राम निपाणा कडून या नाल्याने पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून या रस्त्याने ये-जा करावी लागत आहे या नाल्यावर तात्काळ पुलाची निर्मिती करून पुढील रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी जि.प बांधकाम विभाग अभियंता भागवत साळुंके यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की मोरखेड येथील 121 विद्यार्थी व विद्यार्थिनी दुधलगांव येथे शिक्षणासाठी ये-जा करतात मात्र मरी माता मंदिर जवळ साठीच्या नाल्यातुन पावसाळ्यात पाणी वाहत असल्याने या पाण्यातून विद्यार्थ्यांना ये- जा करावी लागत आहे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन दहा दिवसात या नाल्यावर पुलाची तात्काळ निर्मिती करावी व रस्त्याचे रुंदीकरण करावे अन्यथा त्या नाल्यातच दि.15 सप्टेंबर सोमवार पासून विद्यार्थ्यांसह शेतकरी, ग्रामस्थ व शिवसेना(उबाठा) पदाधिकारी आमरण उपोषण करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आज शनिवार सकाळची शाळा सुटतेवेळी संबंधित नाल्याच्या ठिकाणी जाऊन शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,शहर प्रमुख हरीदास गणबास, युवासेना शहरप्रमुख मंगेश सातव,मोरखेड माजी ग्रा.प सदस्य गणेश उमाळे, उमेश सोनवणे सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.यावेळी नुकतीच शाळा सुटल्यावर नाल्यातील पाण्यातून मार्ग काढतांना ओम काळे, आदेश जंगले, सात्विक नाफडे ,रोहित नाफडे, अथर्व नाफडे, अथर्व चोपडे, प्रशांत राऊत, शरद महाले, केशव रोकडे, तुषार करागंळे, मुक्ता मोरे, अश्विनी तांगडे, भक्ती सोनवणे, दिव्या जंगले, प्राची राऊत, तन्वी तांगडे, पल्लवी तांगडे, वैष्णवी तांगडे, दिव्या रोकडे, तुषार इंगळे, कुणाल पाटील, नैतिक चव्हाण, पवन तांगडे, मंगेश सातव, ज्ञानेश्वर मोरे, ऋषिकेश तांगडे ,नरेंद्र मोरे, प्रतीक तांगडे सह विद्यार्थी व ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.