मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडीच्या वयोवृद्धाला भरधाव बसने चिरडले

Viral news live
By -
0

संदीप जोगी  मुक्ताईनगर ःः....

मुक्ताईनगर तालुक्यातील  कुर्‍हा  येथून बाजार करून आपल्या गावी परतणार्‍या निमखेडी बुद्रुक येथील 83 वर्षीय वृद्धाला बसने चिरडल्याची घटना बुधवार, 24 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली होती. सुपडा निनू सोनवणे (83, रा. निमखेडी बुद्रुक, ता. मुक्ताईनगर) असे मयताचे नाव आहे. 

सुपडा सोनवणे हे निमखेडी बुद्रुक येथे वास्तव्याला होते. बुधवारी कुर्‍हा  येथे बाजार असल्याने ते बाजारात गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चार  वाजण्याच्या सुमारास बाजार आटोपून  सोनवणे हे पायी घरी परतत असताना भरधाव बस (एम.एच.20 बी.एल.1770) ने सोनवणे यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे सोनवणे हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. 

या अपघाताची माहिती मिळताच सोनवणे यांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्घटनेबाबत जिल्हापेठ पोलिसात  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*