![]() |
आदिशक्ती संत मुक्ताईला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून महावस्त्र व सौभाग्य अलंकार समर्पित |
संदीप जोगी / मुक्ताईनगर.....
शक्ती समर्पण महायज्ञ अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून आदिशक्ती संत मुक्ताईच्या चरणी महावस्त्र व सौभाग्य अलंकार समर्पित करण्यात आले. राज्यात नवरात्र उत्सव अतिशय उत्साहात सुरू असून अशा प्रसंगी राज्यातील 25 आदिशक्तीच्या तीर्थक्षेत्रामध्ये महायज्ञ संपन्न होत आहे. सदर उपक्रम राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यामार्फत राबवला जात असून त्याला शक्ती समर्पण महायज्ञ असे नाव देण्यात आलेले आहे.शक्ती समर्पण महायज्ञाच्या माध्यमातून राज्यातील 25 आदिशक्तीच्या तीर्थक्षेत्र ठिकाणी दुर्गाशक्तीचा जागर केला जात आहे. त्याच उपक्रम अंतर्गत शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेश अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी 27 सप्टेंबर शनिवार रोजी कोथळी व मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात विधिवत पूजन करून आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईंना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यामार्फत महावस्त्र आणि सौभाग्य अलंकार समर्पण केले. याप्रसंगी बोलताना अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले की, राज्यातील 25 आदिशक्तीच्या तीर्थक्षेत्रांमध्ये हा महायज्ञ संपन्न होत असून संत मुक्ताबाई यांच्या बद्दलचा श्रद्धाभाव उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह भ प रवींद्र हरणे महाराज , कोथळी मंदिराचे व्यवस्थापक ह भ प उद्धव जुनारे महाराज यांच्या हस्ते व अक्षय महाराज भोसले यांच्या उपस्थितीमध्ये पूजन करत हे महावस्त्र आणि अलंकार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी विनायकराव हरणे, ज्ञानेश्वर हरणे, राम जुनारे तसेच संस्थांनचे विश्वस्त पदाधिकारी देखील उपस्थित होते.