सीसीटीएनएस मानांकनात बुलढाणा जिल्हा पोलीस दल राज्यात चौथ्या क्रमांकावर

Viral news live
By -
0
सीसीटीएनएस मानांकनात बुलढाणा जिल्हा पोलीस दल राज्यात चौथ्या क्रमांकावर
सीसीटीएनएस मानांकनात बुलढाणा जिल्हा पोलीस दल राज्यात चौथ्या क्रमांकावर

पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी

बुलढाणा : सीसीटीएनएस (Crime and Criminal Tracking Network and Systems) या राष्ट्रीय प्रकल्पाच्या राज्यस्तरीय मानांकनात बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने चौथा क्रमांक पटकावला आहे. पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन करत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे.

सीसीटीएनएस हा राष्ट्रीय गुन्हे नोंदवही व ट्रॅकिंग प्रकल्प असून तो एनसीआरबी, नवी दिल्लीमार्फत सर्व राज्यांत राबविला जातो. या प्रकल्पांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व 34 पोलीस ठाण्यांचे संगणकीकरण करण्यात आले असून, संपूर्ण कामकाज ऑनलाइन सुरू आहे. जानेवारी 2025 पासून फॉर्म फीडिंग तसेच एफआयआर प्रकाशन या निकषांमध्ये जिल्ह्याने 10 पैकी 10 गुण मिळवत राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

जून 2025 च्या मानांकनात बुलढाणा जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक मिळविला आहे. या कामगिरीत अपर पोलीस अधिक्षक व सीसीटीएनएस नोडल अधिकारी श्री. अमोल गायकवाड, सीसीटीएनएस प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह पोहेका सुनिल वाघमारे, पोका किरण चिंचोले, मपोहेका दिपामाला पुरंदरे, कविता पाडळे, प्रतिभा इंगळे, नगमा शेख, नापोका संतोष कायंदे, मपोहेका दिपाली खर्चे आदी कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग आहे.

पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे यांनी या कामगिरीबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून, यापुढे आणखी चांगले कार्य करून बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकवावा, असे निर्देश दिले आहेत.

Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*