पाचोरा: अतिक.. खान!"
पाचोरा पोलिसांनी अवैध शस्त्रविक्रीवर कारवाई करत १८ बेकायदेशीर तलवारींसह एका तरुणाला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या तलवारींची किंमत सुमारे ५४ हजार रुपये असून आरोपीने यापूर्वी काही तलवारी विकल्याचे तपासात समोर आले आहे.
ही कारवाई १८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता करण्यात आली. पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ सापळा रचून सोहेल शेख तय्युब शेख (वय २४, रा. स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली देत लपवून ठेवलेल्या तलवारी पोलिसांच्या हवाली केल्या.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गु. रजि. क्र. ४६०/२०२५ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासाद्वारे या शस्त्रसाठ्याचा स्रोत व विक्रीचे जाळे उलगडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.