![]() |
ग्रामपंचायत नगरदेवळाचे दुर्लक्ष : उर्दू जि. प. शाळेसमोरील रस्त्यातील खड्डयामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका ! |
(जळगांव प्रतिनिधी)
नगरदेवळ (ता.पाचोरा …) : ग्रामपंचायत नगरदेवळाच्या दुर्लक्षामुळे उर्दू जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे.
शाळेत येणाऱ्या लहान मुलांना खड्डा टाळताना अनेकदा घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या समस्येकडे ग्रामपंचायतीचे लक्ष वेधले असले तरी अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने रस्त्यावरील खड्डा बुजवून दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. समस्या कायम राहिल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देत आहेत.