![]() |
रावेर लोकसभा अंतर्गत फैजपूर (यावल) येथे ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत स्वच्छता अभियान मध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे सहभागी. |
संदीप जोगी.. मुक्ताईनगर......
दिनांक १७ सप्टेंबर २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “सेवा पंधरवडा २०२५” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या “स्वच्छता हीच सेवा” संकल्पनेनुसार आज भारतीय जनता पार्टी मार्फत रावेर लोकसभा अंतर्गत फैजपूर (यावल) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा तसेच राम मंदिर, खंडोबा वाडी परिसरात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व आमदार .अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात येऊन श्रमदान करण्यात आले.
यावेळी स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.