![]() |
श्री क्षेत्र इच्छादेवी चरणी वडाचे तिसरे झाड अर्पण. |
संदीप जोगी मुक्ताईनगर ....
येथील सिविल सोसायटी चे सदस्य दर वर्षी नवरात्री मधे मुक्ताईनगर ते मध्य प्रदेशातील इच्छापुर येथील श्री क्षेत्र इच्छादेवी मंदिर पर्यंत पर्यावरण पूरक अशी महा सायकल रॅली चे आयोजन करून काढली जाते. गेले वेळी दरवर्षी मुक्ताईनगर हून सोबत एक वडाचे झाड नेवून ते इच्छादेवी परिसरात इच्छा देवी ट्रस्टच्या सोबत योग्य ठिकाणी लावून आई श्री क्षेत्र इच्छादेवी चरणी अर्पण केले जाते. मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी ही एक सामाजिक सेवाधारि लोकांची संस्था असून दरवर्षी प्रमाणे रॅली काढून श्री क्षेत्र इच्छादेवी येथे सोसायटीने संगोपन संवर्धन केलेले वडाचे झाड वृक्षारोपण करीत असतात. सदर सिविल सोसायटीच्या सदस्यांनी दर वर्षी वडाचे झाड लावण्याचे संकल्प घेतला आहे, त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री क्षेत्र इच्छादेवी आज आपला संकल्प पूर्ण केला. सर्व भाविकांचे भक्तांचे व शेतकरी जनतेचे आरोग्य व हंगाम चांगले व्हावे पर्यावरणाचा समतोल राखला जावा या सदिच्छाने सोसायटी ने हा उपक्रम हाती घेतलेला आहे.
विशेष अनमोल सहकार्य व सेवा मामाश्री जैन ग्रुप सुखपूरी इच्छापूर यांच्या वतीने फराळ,फळे व चहा, पाणी व्यवस्था करण्यात आली.