मुक्ताईनगर बस स्थानक चौकशी दूरध्वनी क्रमांक नियमित सुरू असावा अथवा आंदोलन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

Viral news live
By -
0
मुक्ताईनगर बस स्थानक चौकशी दूरध्वनी क्रमांक नियमित सुरू असावा अथवा आंदोलन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
मुक्ताईनगर बस स्थानक चौकशी दूरध्वनी क्रमांक नियमित सुरू असावा अथवा आंदोलन -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.


संदीप जोगी मुक्ताईनगर....
मुक्ताईनगर बस स्थानक येथील चौकशी दूरध्वनी क्रमांक 02583 234 225 सतत कोणीच उचलत नसल्याचे आढळून आले आहे. नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने होणारी ही गैरसोय आहे. सदर क्रमांक हा गाडी ची वेळ जाणून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे परंतु चौकशी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन न उचलने,सतत व्यस्त असणे,फोन घेतल्यास थोड्या वेळाने कॉल करा माहिती देणारे कर्मचारी बाहेर गेले आहेत असे उत्तर आणि अनुभव
नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना येत असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे  अश्विन सुरवाडे, जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्याकडून आगर व्यवस्थापक व बस स्थानक प्रमुख यांना निवेदन देण्यात आले.स्वतः आगर व्यवस्थापक आणि बस स्थानक प्रमुख यांनी सदर क्रमांकावर फोन केल्यावर त्यांना देखील असाच अनुभव आला.त्यांचा फोन देखील कोणी घेतला नाही.
     अशी गैरसोय या पुढे होऊ नये म्हणून योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली,अन्यथा राष्ट्रवादी वि‌द्यार्थी काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला.
यावेळी प्रवीण राठोड, जिशान बागवान,यश शिरतुरे, शुभम शिरतुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*