साकेगाव येथे सेवा पंधरवडा कार्यक्रम उत्साहात संपन्न

Viral news live
By -
0
साकेगाव येथे सेवा पंधरवडा कार्यक्रम उत्साहात संपन्न
साकेगाव येथे सेवा पंधरवडा कार्यक्रम उत्साहात संपन्न
भुसावळ (संदीप जोगी) :
स्मार्ट व्हिलेज साकेगाव येथे ना. संजयभाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ ग्रामीण पश्चिम मंडळाचा सेवा पंधरवडा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या अंतर्गत रेशनकार्ड व निराधार नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरम्यान

तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राची टीम, तसेच संजय गांधी व श्रावणबाळ योजना अधिकारी श्री. सोनवणे, तलाठी मॅडम आदी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांचे ताबडतोब दाखले तयार केले. शेकडो अर्ज दाखल करून घेण्यात आले.

कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गोलुभाऊ पाटील, भाजपा संयोजक संजय पाटील, उपाध्यक्ष सुभाष कोळी, माजी सरपंच अनिलदादा पाटील, विद्यमान सरपंच हिराबाई गणेश कोळी, सुरेश पाटील, चेअरमन राजेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी श्री. सातव, समाजसेवक नरेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य भूषणसिंग राजपूत, अशोक सपकाळे, अनिल सोनवाल, कैलास सपकाळे, सुनील चौधरी, अंगणवाडी सेविका, आरोग्य केंद्र अधिकारी, आशा वर्कर, बचत गटांच्या सीआरपी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आनंद ठाकरे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत प्रशासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम राबविला जात आहे.

या कार्यक्रमाला शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणींना तत्परतेने प्रतिसाद देत आवश्यक ती मदत केली. शेवटी ग्रामपंचायत व प्रशासनाने सर्व मान्यवर व अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*