![]() |
रावेर लोकसभा अंतर्गत मलकापूर येथे ‘सेवा पंधरवडा’ व ‘महाराज्यस्व अभियान’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमास, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित... |
मलकापूर परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा.
दिनांक १७ सप्टेंबर २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत *“सेवा पंधरवडा २०२५”* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, *‘छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व अभियान’* अंतर्गत *तहसिल कार्यालय, मलकापूर* मार्फत जनकल्याणकारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असता, सदर कार्यक्रमास *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *आमदार श्री.चैनसुखजी संचेती* यांच्यासह उपस्थित राहून सदर सेवा पंधरवड्यात जास्तीतजास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
तसेच मागील दोन दिवसात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे *मलकापूर* तालुक्यासह परिसरातील जवळजवळ ७५-८० गावे बाधित झाली असून, *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आमदार श्री.चैनसुखजी संचेती* यांच्यासह संबंधित महसूल व कृषी अधिकारी यांची बैठक घेऊन नुकसानग्रस्त गावांचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे ३६००० हेक्टर पेरणी क्षेत्रातील जवळजवळ ३०००० शेतकऱ्यांच्या शेती व पिकाचे नुकसान झालेले आहे. सरकार बाधित शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे.
यावेळी *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *आमदार श्री.चैनसुख संचेती* यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक अधिकारी, तालुक्यातील ग्रामस्थ इ. उपस्थित होते.