![]() |
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा परिसरात पालकमंत्र्यांची पाहणी. |
नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देणार - गुलाबराव पाटील.
संदीप जोगी / मुक्ताईनगर.....
दि.15 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा भागातील
कुऱ्हा मार्केट परिसर,काकोडा,बोरखेडा,राजुरा, हिवरा,जोंधणखेडा, धुळे,चींचखेडा,सुळे, पारंबी या परिसरात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे व घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे.
पडझड झालेल्या घरांचे व शेतातील नुकसानीची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील , वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. यावेळी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले. तसेच
यावेळी जिल्हाधिकारी डॉ आयुष प्रसाद, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, तालुका प्रमुख नवनीत पाटील, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, माजी जि प अध्यक्ष अशोक कांडेलकर,
तहसीलदार गिरीश वखारे, पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ, यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव व नागरिक उपस्थित होते.
दि.१६ सप्टेंबर २०२४ रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात झालेल्या अती मुसळधार पाऊस व ढगफुटीमुळे मौजे कुऱ्हा_काकोडा येथील एका २५ वर्षीय युवकाचा पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता.
'या दुर्दैवी घटनेनंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी घटनास्थळी भेट दिली.पाहणी दरम्यान मंत्री यांच्या हस्ते मृतकाच्या कुटुंबियांना शासनाकडून रु. ४ लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू आहेत प्रत्येक गावाचे नुकसानीचे पंचनामे संबंधित अधिकारी करीत आहे. शासनाच्या नियमानुसार जी मदत नुकसानग्रस्तांना करता येईल ते लवकरात लवकर कशी करता येईल या संदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच कुऱ्हा येथील बाजारपेठेतील छोटा पूल डीपीडीसी मधून मान्यता देऊन आम्ही मंजूर करून महिनाभरात टेंडर काढून काम सुरू करणार आहोत.
- गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव.
"कुऱ्हा–काकोडा भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठ व शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे सुरू असून शेतकरी व व्यापाऱ्यांना न्याय मिळेल याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल. पालकमंत्री गुलाबराव पाटील व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे. या ठिकाणी नाले खोलीकरण व संरक्षण भिंती उभारण्यासाठी 200 कोटी रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत."
– चंद्रकांत पाटील, आमदार, मुक्ताईनगर विधानसभा