![]() |
संत श्री नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था, त्र्यंबकेश्वरची ५८ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न |
(अतिक खान) त्र्यंबकेश्वर नाशिक
त्र्यंबकेश्वर, दि. १९ सप्टेंबर –
संत श्री नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरची ५८ वी वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीपशेठ शहाणे यांच्या अध्यक्षतेखाली नव्या वास्तूमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषत: नवीन भक्तनिवासाच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला असून, सात मजल्यांपर्यंतच्या बांधकामाला परवानगी मिळाल्याची माहिती सदस्यांना देण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत प्रकाशशेठ भडकवाडे, व्ही.व्ही. उदावंत, संजयशेठ मंडलिक, कैलासशेठ भांबुर्डेकर, सुभाषशेठ शहाणे, विजय देवळालीकर, अभिजित पेडगावकर, चंद्रकांत अंबिलवादे, विजय भडकवाडे, श्रीकांत बोराडे, संदीपशेठ शहाणे, प्रशांत माळवे, सुनील काजळे, सुनील महालकर, प्रकाश कुलथे, सुरेखाताई कपिले यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
गोपाळशेठ कुलथे यांनी संस्थेच्या मागील वर्षातील कार्याचा आढावा सादर केला. तर राजुशेठ कुलथे (किरतांगळीकर) यांनी प्रस्ताविक केले.
संस्थेच्या कार्यामुळे समाजबांधवांचा विश्वास वाढल्याने देणगीदार बांधकामासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.
नवीन पदाधिकाऱ्यांची निवड सभेत करण्यात आली. श्री राजेंद्रशेठ कुलथे (किरतांगळीकर) यांची उपाध्यक्ष म्हणून, सुहासशेठ बार्शीकर यांची सहसचिव म्हणून, संजयभाऊ मंडलिक यांची खजिनदार म्हणून तर रामकृष्णशेठ शहाणे यांची सहखजिनदार म्हणून निवड करण्यात आली. अध्यक्ष श्री दिलीपशेठ शहाणे यांनी निवडी जाहीर करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा तसेच उपस्थित देणगीदारांचा सत्कार केला.
सभेचा समारोप सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने आभार प्रदर्शन करून करण्यात आला.