संदीप जोगी मुक्ताईनगर......
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा परिसरातील 15 शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या विहिरीची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 19 सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उचंदा येथील शेतकरी गणेश माणिकराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवर उचंदा शिवारात गट क्र. 114 शेतजमीन असुन शेतात पेरलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी विहिर असुन त्यात पाणी काढण्यासाठी मोटर बसविलेली आहे. ते 19 रोजी सकाळी 9 सुमारास शेतात जावुन शेतातील कामे करुन सायंकाळी 5 वा घरी परत आलो तेव्हा शेतामध्ये असलेल्या विहीरीत पाण्याची मोटर सुरु असुन त्यास केबल लागलेली होती.
20 रोजी गणेश पाटील हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले व त्यांनी विहिरी मधील पाण्याची मोटर सुरु केली पण मोटार सुरू झाली नाही त्यांनी विहीरी वर जावुन बघितले असता विहीत मोटार चालु करण्याकामी टाकलेली केबल (वायर) विहीरीत दिसुन आली नाही सदर केबलचा शेतामध्ये शोध घेतला असता शेतात कुठेही केबल मिळुन आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने शेतात विहीरी वर लागलेल्या पाण्याच्या मोटरची 40 हजार रूपये किमतीची केबल कापुन चोरुन नेल्याचे त्यांचे निदर्शनास आले.
पाटील यांचे शेतीचे आजुबाजुचे शेतमालक विजय शालीग्राम पाटील , रमेश साहेबराव पाटील, होमराज रामदास पाटील, सचिन वासुदेव पाटील, चेतन श्रीधर पाटील, समाधान पांडुरंग पाटील , जगन्नाथ पांडुरंग पाटील , स्तीराम तापीराम पाटील , देवानंद पंढरीनाथ पाटील , पुंडलीक कालु पाटील , धनराज नारायण पाटील , राजेंद्र कडु पाटील , श्रीकृष्ण मोतीलाल पाटील , दयाराम पंढरीनाथ पाटील सर्व रा. उचंदा ता. मुक्ताईनगर यांना विचारपुस केली असता समजले की त्यांच्या शेतातील सुध्दा पाण्याच्या मोटारीच्या केबल चोरुन नेली आहे.
या प्रकरणी गणेश पाटील यांचे फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पढार करीत आहे.