मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्या जवळील अपघातातील डंपर चालकाचे रक्त नमुने तपासणीसाठी नाशिकला

Viral news live
By -
0
मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्या जवळील अपघातातील डंपर चालकाचे रक्त नमुने तपासणीसाठी नाशिकला
मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्या जवळील अपघातातील डंपर चालकाचे रक्त नमुने तपासणीसाठी नाशिकला 


आमदार चंद्रकांत पाटील यांनी मिळवून दिली 25 लाखाची मदत

संदीप जोगी मुक्ताईनगर....

मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ  राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील मुरूम भरलेल्या डंपर वरील चालकाने  सुसाट वेगाने हलगर्जीपणाने   दुचाकी ला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी सह लहान मुलाचा  जागीच चिरडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 26 सप्टेंबर रोजी दुपारी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान घडली. डंपर हे ठेकेदार  बी एन अग्रवाल यांचे होते . अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वरील सर्वजण आठ ते दहा फूट फरफकट गेले होते . याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये होमगार्ड विजय गवळी यांच्या फिर्यादी वरून डंपर चालक महेंद्र प्रसाद पटेल राहणार महूआबंध तालुका सिंहावल जिल्हा सिंधी मध्यप्रदेश याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता 
चालक पटेल याला शनिवारी भुसावळ येथील न्यायालयात उभे केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन  कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर चालक महेंद्र पटेल याचे रक्त नमुने नाशिक येथील फॉरेन्सिक लॅब येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले असल्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ  यांनी सांगितले.

@@ आमदार चंद्रकांत पाटील यांनी मिळवून दिली मदत ........
मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मयत कुटुंबीयांचे वारसांना ठेकेदार अग्रवाल यांच्याकडून 25 लाखाची मदत मिळवून दिली. शनिवारी 25 लाखाचा धनादेश आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मयतांचे नातेवाईक यांना देण्यात आला.

  शुक्रवारी झालेल्या  अपघातामध्ये  नितेश जगतसिंग चव्हाण वय 32 , सुनिता नितेश चव्हाण वय 25,  सुखविंदर नितेश चव्हाण वय ७  यांचा मृत्यू झाला  असून नेहालसिंग नितेशसिंग चव्हाण वय 10 हा मुलगा जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. सर्व राहणार मातापुर तालुका डोईफोडिया जिल्हा बुऱ्हानपूर ( मध्यप्रदेश)  येथील रहिवासी आहेत. सध्या ते जळगाव येथे वास्तव्यात असून इच्छापूर्  मध्य प्रदेश मधील देवीच्या दर्शनासाठी ते कुटुंबासह निघालेले होते परंतु रस्त्यातच काळाचा घाला त्यांच्यावर ओढवला गेला.

छत्रपती संभाजी नगर ते इंदोर पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असून मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्याजवळ अंडरपास  पूलाचे काम चालू आहे. बी एन अग्रवाल हे ठेकेदार हे काम करीत आहे.  या रस्त्यावर खडी व मुरूम टाकण्याचे काम सुरु आहे. 26 रोजी शुक्रवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान खडी भरलेला डंपर क्रमांक  MH19 CX2038  वरील चालकाने भरधाव वेगात चालवत येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक MP 48 ML2695 यांचा जोरदार अपघात झाल्याने यामध्ये पती-पत्नी व मुलगा यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला होता.

एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी चालकास चोप दिला. तर डंपरची केबिन नागरिकांनी जाळून टाकली . सदरील  डंपर  बी. एन. अग्रवाल यांचे असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ  यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे करीत आहे .

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*