![]() |
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते ‘स्वदेशी 4G नेटवर्क’ तंत्रज्ञानाचा शुभारंभ… |
(अतिक खान)मुक्ताईनगर
येरवडा (पुणे) येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित...
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी आज ओडिसा येथे आयोजित कार्यक्रमातून *‘स्वदेशी 4G स्टॅक’ व डिजिटल भारत निधी' (DBN)’ अंतर्गत स्वदेशी 4G नेटवर्क तंत्रज्ञानचा शुभारंभ केला. यावेळी *येरवडा (पुणे) येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
सदर योजनेंतर्गत देशभरातील 92,633 टॉवर्सपैकी 9,020 टॉवर्स महाराष्ट्रात असून 24,680 गावांना यामुळे उच्च दर्जाची 4G सेवा मिळणार आहे. ही केवळ मोबाईल नेटवर्क विस्ताराची घटना नाही, तर ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योगासाठी परिवर्तनकारी पाऊल आहे.गाव इंटरनेटशी जोडले गेले की ते थेट जगाशी जोडले जाते – आणि हीच खरी डिजिटल क्रांती आहे.
BSNL च्या माध्यमातून ही प्रणाली २२ महिन्यांमध्ये तयार करण्यात आली असून, सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी* यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात स्वदेशी 4G तंत्रज्ञान* विकसित करणारे भारत हे जगातील 5 वे राष्ट्र ठरले आहे. या क्षणाचे वर्णन 'भारताची डिजिटल तंत्रज्ञात मोठी झेप' असे करायला हवे. सशक्त आणि सक्षम भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलले जात असून, हा अभिमानाचा क्षण असण्यासोबत औद्योगिक क्रांतीनंतरचा महत्वाचा क्षण आहे.
आज पुणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, खासदार श्रीमती मेधा कुलकर्णी, आमदार श्री. विजयजी शिवतरे, श्री. योगेशजी टिळेकर, श्री. हेमंतजी रासने, श्री. बाप्पू पठारे, श्री.अमित गोरखे, माजी आमदार श्री.जगदीश मुळीक, भाजपा शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे, शिवसेना पुणे शहरप्रमुख श्री. नाना भानगिरे, यांच्यासह BSNL व Airtel चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.