![]() |
मुक्ताईनगर येथे महसूल विभागातर्फे सेवा पंधरवाडा कार्यक्रम अधिकाऱ्यांची केली नियुक्ती |
संदीप जोगी मुक्ताईनगर ...
..... केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या 3 सप्टेंबर च्या बैठकी नुसार व नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या व्हिसी च्या अनुषंगाने महसूल विभागातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा राबविला जाणार आहे. 10 सप्टेंबर रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सेवा पंधरवाडा राबविण्यासंदर्भात तहसीलदारांना सोबत व्हिसी झाली. मुक्ताईनगर महसूल विभागातर्फे सेवा पंधरवडा राबविण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून तालुक्यातील लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार गिरीश वखारे यांनी केलेले आहे.
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान महसूल विभागातर्फे विविध कामकाजांच्या अंमलबजावणीसाठी सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. पंधरवड्यामध्ये महसूल थकबाकी वसुली जिवंत सातबारा उतारा यामध्ये मयत खातेदारांची नावे व घडणे व वारसांची नावे दाखल करणे, जिवंत शिधापत्रिका यामध्ये अपात्र व मृत लाभार्थी नाव वगळणी करणे, शेत सुलभ योजना, शेत रस्ते पानंद रस्त्याची नोंदणी, दफनभूमी स्मशानभूमीवरील अतिक्रमण निष्कासन करणे, छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिराचे आयोजन करणे, महाविद्यालयीन शिबिरे घेणे यामध्ये विद्यार्थ्यांना विविध दाखले उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे व दाखले वाटपासाठी शिबिर आयोजित करणे ,भोगवटादार वर्ग दोन जमिनीचे वर्ग रूपांतर करणे यामध्ये पुनर्वसन कायद्या अंतर्गत प्राप्त जमिनीची धारकांकडून रूपांतरण करण्यासाठी प्राप्त रकमा भरणा करून घेणे या कामकाजासाठी निवासी नायब तहसीलदार निकेतन वाडे, निवडणूक नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, पुरवठा निरीक्षक रुषी गावडे, कुळ कायदा अव्वल कारकून दीपक भुतेकर, सांगायो अ का कैलास पाटील, महसूल सहाय्यक किरण बाविस्कर, कृष्णा माळी ,गौरव पाटील ,स्वप्नील खोले ,उमेश झाल्टे व सर्व मंडळ अधिकारी काम पाहणार आहेत. नुकतीच तहसीलदार गिरीश वखारे यांनी तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक तहसील कार्यालयात घेतली