कोलते महाविद्यालयातील प्राध्यापकांचे संशोधन व शैक्षणिक कार्य उजाळले

Viral news live
By -
0
कोलते महाविद्यालयातील प्राध्यापकांचे संशोधन व शैक्षणिक कार्य उजाळले
कोलते महाविद्यालयातील प्राध्यापकांचे संशोधन व शैक्षणिक कार्य उजाळले

(महाविद्यालयातून विद्यार्थ्यांसाठी दोन पुस्तके प्रकाशित

मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर हे महाविद्यालय शैक्षणिक, संशोधन व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नेहमीच आघाडीवर आहे. या परंपरेला पुढे नेत महाविद्यालयातील नामवंत प्राध्यापकांचे दोन महत्वाचे पुस्तके नुकतेच प्रकाशित झाले आहेत.

प्रा. डॉ. दीपक ए. झोपे यांचे “फाउंडेशन ऑफ फिजिक्स” हे पुस्तक पॅगिफाय पब्लिकेशनमार्फत तर प्रा. पांडुरंग व्ही. चोपडे व प्रा. दीपक पी. खरात यांचे “एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग” हे पुस्तक आदित्य पब्लिकेशनमार्फत प्रकाशित झाले.


भौतिकशास्त्रातील गती, बल, उर्जा, विद्युत, चुंबकत्व, प्रकाश, तरंगलहरी, उष्णतागतिकी अशा मूलभूत संकल्पना विद्यार्थी-अनुकूल पद्धतीने समजावून देणारे फाउंडेशन ऑफ फिजिक्स हे पुस्तक विज्ञान शाखेतील विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. दुसरीकडे, एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग यात यंत्रांचे घटक, ऊर्जेचे तत्त्वज्ञान, ऊष्मागतिकी, द्रव यांत्रिकी, उष्णता व उर्जा हस्तांतरण, पॉवर प्लांट्स इत्यादी विषय सोप्या व सखोल पद्धतीने मांडले आहेत. हे पुस्तक बी.ई./बी.टेक. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.


या पुस्तक प्रकाशनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील आणि खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे यांनी प्रा. झोपे, प्रा. चोपडे व प्रा. खरात यांचा विशेष सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच व्यवस्थापनातील उपाध्यक्ष श्री. प्रदीप कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते, सदस्य श्री. देवेंद्र पाटील, श्री. अनिल इंगळे, श्री. पराग पाटील व डॉ. गौरव कोलते यांनीही आपल्या शुभेच्छा दिल्या.


या प्रकाशनाबद्दल बोलताना प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी सांगितले की, “फाउंडेशन ऑफ फिजिक्स” व “एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग” ही दोन्ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची भक्कम पायाभरणी करतील व त्यांना उच्च शिक्षण तसेच संशोधन क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी निश्चितच मदत करतील.महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे प्रकाशित झालेली ही पुस्तके केवळ कोलते महाविद्यालयासाठीच नव्हे तर विज्ञान व तांत्रिक शिक्षण क्षेत्रासाठीही एक मोलाची देणगी ठरणार आहेत.

Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*