![]() |
मलकापूर ग्रामीण ग्रा.पं हद्दीतील हनुमान नगर मधील डीपी दोनशे के.व्हि.ची करा अन्यथा आंदोलनाचा शिवसेना (उबाठा) चा इशारा |
मलकापुर:- ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील हनुमान नगर मधील बर्फ कारखान्या जवळील डीपी शंभर केव्हीची असून वाढती लोकसंख्या लक्षात घेता या भागात 200 केव्हिची डि.पी बसविण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता आर.जि.तायडे यांचेकडे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, हनुमान नगर भागात 1995 पासून बर्फ कारखान्याजवळ शंभर केव्ही ची डिपी असून हनुमान नगर भागात रहिवासी ग्रामस्थांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडीत होत असून उपकरणाचे नुकसान होत आहे त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, तसेच या भागातील विद्युत वाहक तारा लोंबकळल्या असून या तारांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याने तारांऐवजी केबल वायरची व्यवस्था करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. निवेदनावर शिवसेना उपजिल्हा गजानन ठोसर, शहर प्रमुख हरीदास गणबास, उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, युवासेना तालुकाप्रमुख पवन गरुड, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम सै.रहीम, विश्वनाथ पुरकर,दिपक कोथळकर, अविनाश सावळे,सागर संबारे, राहुल गणबास, तुषार साठे, वेदांत निवाने, सुपेश पाटील, सुपेश लांडे, पवन साठे, कुणाल मेहसरे, विजय जोशी, उमेश तळोले, गजानन चव्हाण, मुरलीधर तळोले, बळीराम भवर, सरलाबाई कोल्हे, निलेश कोल्हे, पांडुरंग करांडे, रमेश जामोदे, शेख मोहसीन शेख छोटू, वसीम जमादार, सत्तार शाह,मुस्ताक पठाण सह शिवसेना पदाधिकारी व रहिवासी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या नमूद आहे.