![]() |
बन्सीलाल नगर भागात धूर फवारणी व लाईट बसवण्याची निलेश चोपडे यांची मागणी |
दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन च्या माध्यमातून फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय निलेश भाऊ चोपडे यांनी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतला निवेदन सादर केले निवेदनात नमूद आहे की मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बन्सीलाल नगर भागात सततच्या पावसामुळे पाणी साचून व गवताचे प्रमाण वाढल्याने डासांची संख्या वाढली आहे त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून या डासामुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तरी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत मार्फत बन्सीलाल नगर भागात त्वरित धूर फवारणी करण्यात यावी तसेच बन्सीलाल नगर रोडवरील दयानंद सरस्वती मार्ग या ठिकाणी रस्त्याला कॉर्नर असून रहिवाशांची सतत वर्दळ सुरू असते या ठिकाणी रात्रीच्या वेळी लाईट नसल्यामुळे अंधार पडत असून व मोकाट जनावर बसलेली असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी विजेच्या पोल किंवा डीपीच्या खांबावर लाईट बसवण्यात यावा या विषयी बऱ्याच वेळा ग्रामपंचायत पदाधिकारीयांच्याशी निलेश चोपडे यांनी चर्चा करून सुद्धा ग्रामपंचायच्या वतीने लाईट व धूर फवारणी करण्यात आली नसल्याने अश्या प्रकारचे निवेदन सादर करण्यात आले