जिल्ह्यातील सर्वात मोठी गुटखा कारवाई – 1.43 कोटींचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपी अटकेत

Viral news live
By -
0
जिल्ह्यातील सर्वात मोठी गुटखा कारवाई – 1.43 कोटींचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपी अटकेत
जिल्ह्यातील सर्वात मोठी गुटखा कारवाई – 1.43 कोटींचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेने मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधीत पान मसाला जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 1 कोटी 43 लाख 9 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन ट्रक चालकांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरणाऱ्या गुटखा व तत्सम पदार्थांच्या विक्री, साठवणूक व वाहतुकीवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.

३० सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, अमरावतीहून मुंबईकडे जाणाऱ्या दोन अशोक लेलैंड ट्रकमध्ये शासनबंदी असलेला गुटखा व पान मसाला वाहून नेला जात आहे. त्यानुसार मेहकर हद्दीतील फर्दापूर टोल प्लाझा येथे पथकाने सापळा रचला. मिळालेल्या माहितीप्रमाणे दोन ट्रक रोखून तपासणी करण्यात आली असता त्यामधून गुटखा व पान मसाल्याचे पोते आढळून आले. ट्रकचालकांसह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – मोहम्मद इम्रान मोह. हफिज (२८, रा. बियाबानी मोहल्ला, अचलपूर, जि. अमरावती), अजीम वेग हाफिन बेग (३६, रा. अन्सारनगर, अमरावती) आणि एजाज अहमद अजीज अहमद (३१, रा. शिरजगाव, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती).

या कारवाईत गुटखा २६४ पोती ज्याची किंमत १ कोटी १३ लाख ९ हजार ७६० रुपये इतकी आहे तसेच अशोक लेलैंड कंपनीचे दोन ट्रक ज्यांची किंमत ३० लाख रुपये इतकी आहे, असा एकूण १ कोटी ४३ लाख ९ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम २७४, २७५, २२३, १२३ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ मधील कलम २६, २७, ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकामध्ये पोउपनि. प्रताप बाजड, अविनाश जायभाये, पोहेकॉ. शरद गिरी, दीपक लेकुरवाळे, पुरुषोत्तम आघाव, गणेश पाटील, पोकॉ. निलेश राजपूत, मपोकॉ. पूजा जाधव, समाधान टेकाळे यांचा समावेश होता. तसेच पोहेकॉ. राजू आडवे व पोकॉ. ऋषीकेष खंडेराव (तांत्रिक विश्लेषण विभाग) यांनीही या कारवाईत सहभाग नोंदवला.

जिल्ह्यातील सर्वात मोठी गुटखा कारवाई – 1.43 कोटींचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपी अटकेत
जिल्ह्यातील सर्वात मोठी गुटखा कारवाई – 1.43 कोटींचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपी अटकेत


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)