![]() |
मुक्ताईनगर येथे नगरपंचायतीचा अतिक्रमणावर हातोडा – सणासुदीत उपासमारीची वेळ |
(अतिक खान, मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौक परिसरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. याबाबत नगरपंचायतीकडून पूर्वीच दुकानदारांना वारंवार नोटीस देण्यात आली होती. मात्र नोटीस मिळूनही रस्त्यावर अतिक्रमण सुरूच असल्याने अखेर नगरपंचायत प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढले.
या कारवाईमुळे अनेक लहान दुकानदारांना सणासुदीच्या काळात उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. अतिक्रमण धारकांनी प्रशासनाकडे पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
नगरपंचायतीची कारवाई कायदेशीर असली तरी व्यापार्यांचे प्रश्न कायम आहेत. आता प्रशासन या मागण्यांकडे सकारात्मक पद्धतीने पाहते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.