![]() |
रिपब्लिकन युवा सेनेची राहुरी शहर शाखा भव्य उदघाटन सोहळा व पदनियुक्ती संपन्न |
(अतिक खान – अहिल्यानगर)
राहुरी तालुक्यात शाहू, फुले, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन युवा सेनेच्या राहुरी शहर शाखेचे भव्य उदघाटन व पदनियुक्तीचा सोहळा मिशन कंपाऊंड, राहुरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम दिनांक २५ सप्टेंबर रोजी रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती सन्माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरणभाऊ घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या प्रसंगी राहुरी शहर अध्यक्ष पदी स्वप्नील मधुकर लोखंडे, उपाध्यक्ष पदी अमित बाळाजी शिरसाठ, महासचिव पदी साहिल मुकुंद पठाण तर सचिव पदी मयूर संदीप माळी यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याला जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव, जिल्हा महासचिव अमोलजी मकासरे, जिल्हा उपाध्यक्ष चांगदेवजी भिसे, जिल्हा सचिव विधाटे सर, राहुरी तालुका प्रेस मीडिया अध्यक्ष प्रवीण गायकवाड, आदिवासी समाज पार्टी महाराष्ट्र अध्यक्षा बावस्कर मॅडम, महिला युवा अध्यक्ष सुरेखाताई गुंजाळ, राहुरी तालुका अध्यक्ष योगेश पवार, तालुका उपाध्यक्ष अनिल साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश करून रिपब्लिकन युवा सेनेची ताकद अधिक बळकट केली. राहुरी शहर शाखेच्या स्थापनेमुळे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला