जळगाव रेल्वे स्थानकावर अमृत भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत
(भुसावळ अतिक खान)
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ब्रम्हपूर – उधना (सुरत) अमृत भारत एक्सप्रेसचे लोकार्पण पार पडले. उद्घाटनानंतर जळगाव रेल्वे स्थानकावर या गाडीचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
जळगाव लोकसभेतील अमळनेर, धरणगाव व जळगाव स्थानकावर थांबा मिळाल्याने प्रवासी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या ऐतिहासिक सोयीबद्दल नागरिकांनी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले.
स्वागतावेळी रेल्वे स्थानक परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. विद्यार्थी, प्रवासी संघटना तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्षणाचे साक्षीदार झाले.