![]() |
ग्रामगौरव फाउंडेशनचा नवरात्री निमित्त उपक्रम : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अर्धांगिनी यामिनीताई यांचा 'साक्षलक्ष्मी' सन्मानाने जागर |
संदीप जोगी| मुक्ताईनगर...
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे राहून त्यांचे आजतागायत चढत्या कमानीचे काम पुढे नेण्यास मदतगार ठरलेल्या त्यांच्या सौभाग्यवती यामिनीताई पाटील यांना आ.पाटील यांच्या विशेष उपस्थितीत 'साक्षलक्ष्मी' सन्मान प्रदान करण्यात आला.
'नानात्वेन सुदृढ: समाज!' म्हणजे विविध उपक्रमांमधून सशक्त समाजाची निर्मिती या उद्देशाने ग्रामगौरव फाउंडेशन राज्यभर काम करीत असताना यंदा नवरात्र उत्सवाच्या काळात जळगाव व पुणे जिल्ह्यातील सर्वच महिला लोकप्रतिनिधी व मंत्री,खासदार तसेच आमदारांच्या सौभाग्यवतींना महिलाशक्तीचा जागर म्हणून 'साक्षलक्ष्मी' सन्मानाने गौरवान्वित करणारा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.ग्रामगौरव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे,उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे व सचिव सुभाष मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रीच्या नऊ दिवसात संस्थेच्या कार्याध्यक्षा कु.धनश्री विवेक ठाकरे आपल्या संस्थेच्या सहकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन सन्मानार्थी सौभाग्यवतींना अत्यंत कृतज्ञ भावानेने साडी, खण- नारळाने ओटी भरून 'साक्षलक्ष्मी' गौरवचिन्ह देत सन्मान करीत आहेत.
आ.चंद्रकांत पाटील यांचे एक शिवसेना शाखाप्रमुख तर पक्षाचे जिल्हाप्रमुख त्यानंतर २०१९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून जॉईंट किलर म्हणून अपक्ष आमदार आणि पुन्हा दुसऱ्यांदा २०२४ मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून येणे या सर्व २५-३० वर्षाच्या वाटचालीत त्यांच्यासोबत साक्षात लक्ष्मीप्रमाणे कार्यरत यामिनीताई पाटील यांच्या योगदानाची दखल म्हणून नवरात्रीच्या घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी त्यांना 'साक्षलक्ष्मी' सन्मान प्रदान करण्यात आला.
घरी जाऊन केला सन्मान :
अत्यंत साध्या पद्धतीने कोणताही बडेजाव न करता कौटुंबिक सोपास्कारात थेट आ. पाटील यांच्या घरी पोहचत ग्रामगौरवने हा सन्मान कार्यक्रम घेतला.ग्रामगौरवचे दस्तगीर खाटीक,गौरव रणदिवे,योगेश भोई, संजय निकुंभ,प्रकाश पवार,रजनी पवार,अरुण इंगळे,दीपा बाणाईत, योगेश पाटील,शीतल वाघ आदी उपक्रमात सहभागी आहे.