![]() |
शिवसेना (ऊ बा ठा)कडून गैरहजर असलेल्या मलकापूर नगरपालिकच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार तर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन कर्तव्याची जाणीव करून दिली |
मलकापूर प्रतिनिधी :- मलकापूर शहरातील नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी व ईतर विभागाचे अधिकारी सतत गैरहजर असल्याबाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यामुळे उबाठा तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वा. नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या दालनाला कुलूप असल्याने दरवाज्यावर हार तर प्रत्येक अधिकारी उपमुख्याधिकारी, आरोग्य, पाणी पुरवठा, जन्म-मृतू, नगर अभियंता, घरकुल, नियोजन, महिला व बचत, कार्यालय अतिवेक्षक, कर, वित्त, मिळकत, वृक्ष, सभाकामकाज, अग्निशामक या सर्व विभागाच्या दालनात घुसून गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून तर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना गुलाबाचे पुष्प देऊन आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे तसेच मुख्याधिकारी नसल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली, अधिकाऱ्यांना शिवसैनिकांना व नागरिकांना जाब द्यावा लागला, नागरिकांना आपल्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने अनेक नेते मंडळी व नागरिक त्रस्त झालेले आहे, प्रशासक व मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे यांच्याकडे दोन नगरपालिकेच्या कामाचा व्याप असल्यामुळे मलकापूर कडे मुख्याधिकाऱ्यांचं लक्ष नसल्याचे नियोजन शून्य कार्यक्रम चालू आहे. होऊ घातलेल्या सणांना पाहता पाणी पुरवठा २ आठवड्यानंतर होत आहे, बरेच स्ट्रीट लाईट, हायमास्ट बंद आहेत, घाणीचे साम्राज्य सगळी कडे पसरलेले आहे, त्यामुळे आज रोजी शिवसेना उबाठा कडून कर्तव्याची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून नगरपालिकेच्या प्रत्येक दालनात जाऊन कर्तव्याची जाणीव करून दिल्याचे काम केले आहे.
एकीकडे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे, उबाठा मलकापूर च्या वतीने केलेल्या या गांधीगिरी मोर्चाने महाराष्ट्र सेवा पंधरवडा याच्या वर प्रास चिन्ह उपस्थित झाले आहे हे मात्र खरेच.
यावेळी तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील, यांच्या सह गणेश सुशीर विभाग प्रमुख, जुबेर खान, पुरुषोत्तम पाटील, किशोर सिंह राजपूत, गोपाळ पाटील, निलेश सुशीर, अतुल सिंह राजपूत, प्रवीण पाचपोर, सुभाष पाटील, कैलास इंगळे, भावसिंग राजपूत, दशरथ सिंग राजपूत, सोपान तळोले, दिनकर तळोले, प्रशांत तळोले, भगवान नारखेडे, सोपान नारखेडे, गजानन कोल्हे, धनराज कोल्हे, पुरुषोत्तम पाटील, प्रकाश सुषिर, मधुकर तळोले, नासिर शेख, आसीम खान व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.