![]() |
देवाभाऊ फाउंडेशन रावेर लोकसभा समन्वयक पदी पंकज कोळी |
संदीप जोगी, मुक्ताईनगर ....
देवाभाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ची संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये रावेर लोकसभेच्या समन्वयक पदी पंकज कोळी यांची निवड करण्यात आली.
देवाभाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या उत्तर महाराष्ट्रातील नियुक्त्या मुख्य समन्वयक गजानन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सह समन्वयक डॉ.आशुतोष घोलप, प्रदेश सह समन्वयक प्रविण अलाई यांनी जाहीर केलेली आहे.
पंकज कोळी हे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत. निवडीबद्दल कोळी यांचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्रमंडळी यांनी अभिनंदन केलेले आहे.