जळगाव गुन्हे शाखेची धडक कारवाई : दरोड्याचा उलगडा, ४ आरोपी जेरबंद

Atik Khan
By -
0
जळगाव गुन्हे शाखेची धडक कारवाई : दरोड्याचा उलगडा, ४ आरोपी जेरबंद

जळगाव : अतिक खान
 क्राईम  न्यूज
जळगाव शहरातील मोठ्या दरोड्याचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ आरोपींना अटक केली आहे. दि. ९ सप्टेंबर रोजी रावेर रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशावर हल्ला करून त्याच्याकडील रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून नेण्यात आली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना या प्रकरणी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथक तयार करण्यात आले. संशयितांची हालचाल जी.एस. ग्राऊंड परिसरात आढळल्याने पोलिसांनी विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर असलेल्या चार इसमांना पाठलाग करून पकडले.

अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे –

किरण पंडीत हिवरे (३२, रा. भातखेडा, ता. रावेर)

अजय सुपडू कोचुरे (२५, रा. खिडर्डी, ता. रावेर)

हरिष अनिल रायपुरे (२५, रा. प्रतापपुरा, बऱ्हाणपुर, मध्यप्रदेश)

गोकुळ श्रावण भालेराव (२७, रा. डांभुर्णी, ता. यावल)


गुन्ह्यातील ₹४.५० लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली असून, आरोपींनी कबुली दिल्याप्रमाणे रक्कम वाटपासाठी जळगावात जमा केली होती. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकातील पोउपनि सोपान गोरे, पोहेकॉ प्रितमकुमार पाटील, यशवंत टहाकळे, बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या कारवाईमुळे शहरातील सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.


Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*