![]() |
मुक्ताईनगरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अशोभनीय वक्तव्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध. |
संदीप जोगी मुक्ताईनगर.....
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांच्या विरुद्ध खालच्या पातळीची, असभ्य टीका केली आहे. त्यांनी जयंतराव पाटील यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू आणि त्यांच्या आई यांच्या वरही लज्जास्पद, अशोभनीय वक्तव्य केले आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याचा मुक्ताईनगर शहरात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र निषेध करीत जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
या प्रकारच्या वक्त्यामुळे महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला धक्का पोहोचला आहे. मतभेद असले तरी परस्परांचा मान राखणे आणि सभ्य भाषेत राजकारण करणे ही आपल्या राज्याची सुसंस्कृत परंपरा आहे, जी पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोडली गेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे या अशोभनीय वक्त्याविरुद्ध तात्काळ सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली आहे; अन्यथा पक्ष रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन केले जाणार आहे.
तरी आपल्याला विनंती आहे की या विषयाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आलेली आहे.
प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील, निवृत्ती पाटील, राजू माळी, बबलू सापधरे, ईश्वर रहाणे, बापू ससाने, योगेश काळे, एडवोकेट राहुल पाटील, रितेश जैन, लताताई सावकारे, संजय कोळी ,निलेश भालेराव, संजय कपले उपस्थित होते.