![]() |
जळगावात ‘जेलभरो’ आंदोलन; घोषणाबाजीने परिसर दणाणला |
जळगाव (अतिक खान) :
भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा ओबीसी मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या प्रमुख संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ‘जेलभरो आंदोलन’ करण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी केली. आगामी निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, जातीनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, तसेच अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार त्वरित थांबवावेत यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी सरकारकडे आवाज बुलंद केला.
कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि निदर्शनांमुळे परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी सांगितले की, “लोकशाहीची खरी ताकद जनतेत आहे. निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बॅलेट पेपर प्रणाली हीच योग्य पर्याय आहे.”
पोलिस बंदोबस्तात आंदोलन पार पडले असून, निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांनी मागण्यांवर ठाम भूमिका मांडली.