![]() |
मलकापुर,नांदुरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकरी व नळगंगा नदी काठावरील नागरीकांना तात्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी शिवसेना (उबाठा) चे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन |
मलकापुर:- नांदुरा व मलकापूर तालुक्यात सोमवार व मंगळवार रोजी झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मका व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास अतीवृष्टीने हिरावून घेतला असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. तसेच मलकापूर शहरातील नळगंगा नदी काठावरील लोकांच्या घरात पाणी घुसले नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूचें मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शेतकऱ्यांना व नागरिकांना तात्काळ आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याने त्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,शहरप्रमुख हरीदास गणबास, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, उपशहरप्रमुख शकील जमादार, युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड, युवासेना शहरप्रमुख मंगेश सातव, किसानसेना शहर प्रमुख सै.वसीम सै.रहीम, वाहतूकसेना शहरप्रमुख इम्रान लकी, शिवसेना विभाग प्रमुख चांद चव्हाण, सत्तार शाह, वसीम जमादार,किसन पाटील, किशोर राऊत, विश्वनाथ पुरकर,दिपक कोथळकर,पुंजाजी तायडे ,शे.मोहसीन, मोहसीन खान आरीफ खान,शारीक अहमद अब्दुल रहू, इलियास शाह, लुकमानशाह इस्माईल शाह, सै. जमीर, इरफान शाह, मो. साजिद अ.गणी, जावेदखान जकाखान सह शिवसेना पदाधिकारी शेतकरी व नागरीकांच्या सह्या नमूद आहे.