आर एफ ओ यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
संदीप जोगी मुक्ताईनगर......
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी मानेगाव शिवारात गेल्या तीन दिवसाआधी वन्य प्राण्यांचे पायाचे ठसे मिळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वन विभागाला मिळालेले वन्य प्राण्यांचे ठसे हे वाघाचे असल्याचे खुद्द जिल्हा वन अधिकारी यांनी सांगितलेले असून स्थानिक मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी (आर एफ ओ) यांच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे शेतकरी नागरिकांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे. दोन दिवसांमध्ये वन विभागातर्फे कुठलेही जनजागृती केलेली नसल्याचे पोलीस पाटील यांनी सांगितले.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी मानेगाव शिवारातील शेत परिसरात वन्य प्राण्याचे ठसे आढळून आलेले असून ते वाघाचे पायाचे ठसे असल्याचे निष्पन्न झालेले असून ज्या ठिकाणी ठसे आढळून आलेले आहेत त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावलेले असल्याचे जिल्हा वन अधिकारी राम धोत्रे यांनी सांगितले. मानवी वस्तीमध्ये वाघाचे अस्तित्व याच्यावरून दिसून येत असून तीन दिवसापासून वाघाचे ठसे मानेगाव कोथळी शेत शिवारात मिळून आले तरी अजूनही वरिष्ठ वन अधिकारी घटनास्थळी आलेले नसल्याचे समजते. तसेच कुठलेही जनजागृती याविषयी वनविभागाकडून केली जात नसल्याचे बोलले जात आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी मानेगाव परिसरात दोन दिवसापासून मोठ्या प्रकारचे वन्य प्राण्याचे ठसे असे दिसून आल्याने शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी चे पोलीस पाटील संजय चौधरी यांच्याशी संपर्क साधला होता.
रविवारी सकाळी पुन्हा दुसऱ्या शेतामध्ये ठसे दिसून आल्याने नागरिक शेतकऱ्यांनी बघितले . पोलीस पाटील चौधरी यांनी जिल्हा वन अधिकारी श्री धोत्रे यांच्याशी संपर्क साधला होता. श्री धोत्रे यांनी तात्काळ वन विभागाचे तीन ते चार पथक तयार करून सदर परिसरामध्ये ट्रॅप कॅमेरे लावण्याचा सूचना कर्मचाऱ्यांना केल्या होत्या.
त्यानुसार सोमवारी वनविभागाचे कर्मचारी यांनी मानेगाव शिवारातील शेत शिवारात दोन ठिकाणी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान ट्रॅप त्यामध्ये लावलेले आहेत. प्रत्यक्ष स्थळी पत्रकार संदीप जोगी यांनी भेट देत पाहणी करीत त्या ठिकाणी वन कर्मचारी श्रीमती दिपाली बेलदार, मानेगावचे पोलीस पाटील दिलीप पाटील , वन विभागाचे शिपाई यांचे सह तीन ते चार शेतकरी यांचे उपस्थितीमध्ये ट्रॅप कॅमेरे लावलेले असल्याचे दिसून आले.
या प्रकारामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा, कोथळी, सालबर्डी, मुक्ताईनगर, मानेगाव या परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे त्यांना वन विभागाने जनजागृती करून तसेच संबंधित हे सर्व प्राणी याला बंदिस्त किंवा या परिसरात त्याचा वावर आहे किंवा नाही याचा तपास करून शेतकऱ्यांच्या मनातील जो धाक आहे तो काढून सहकार्य करावे ही मागणी शेतकऱ्यांची आहे.
मानेगाव कोथळी सालबर्डी चांगदेव परिसरातील शेत शिवारात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे दिसून येत असून परिसरात मिळालेल्या पायांच्या ठशावरून सदरचे ठसे हे वाघाचे असल्याचे निदर्शनास आलेले आहे. पायाचे ठसे जर वाघाचे असतील तर तो वाघ कुठन
मार्ग भ्रमण करीत होता, असलेल्या नदीच्या द्वारे पोहोत आला होता का, खरंच वाघ असेल तर तो कोणत्या कॉरिडॉर मधून इकडे आला हे पण बघावे लागेल, वाघाचे ठसे आढळले त्या ठिकाणावरून मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनपरिक्षेत्र जवळपास 60 किलोमीटर अंतरावर आहे, इकडे रावेर पाल परिसरातून वाघाचे भ्रमण इकडे झालेले असेल का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून शेवटी वन विभाग हा प्रश्न सोडवू शकेल असे समजते.
@@@ डीएफओ यांनी दिली होती आरएफओ यांना समज.....
मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी (आर एफ ओ) श्रीमती कृपाली शिंदे ह्या परिसरातील सरपंच व पोलीस पाटील यांचे फोन उचलत नाहीत अशा तक्रारी असल्याने आर एफ ओ शिंदे यांना योग्य समज दिलेली असल्याचे डीएफओ श्री राम धोत्रे यांनी सांगितले.
@@@ आमच्या मानेगाव कोथळी परिसरामध्ये शेत शिवारामध्ये वन्यप्राणी वाघाचे ठसे आढळून आलेले असून याविषयी कुठलीही जनजागृती अजून पर्यंत वनविभागातर्फे करण्यात आलेली नाही. मी स्वतः आमच्या परिसरातील व्हाट्सअप ग्रुप वर याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती च
मेसेज टाकलेले असून कोणीही एकटे शेतामध्ये येऊ नये असे आवाहन केलेले असल्याचे मानेगाव चे पोलीस पाटील दिलीप पाटील व कोथळी चे पोलीस पाटील संजय चौधरी यांनी सांगितले.
@@ तीन टीम केल्या आहेत... याविषयी वन विभाग कर्मचाऱ्यांची वेगवेगळे तीन पथक तयार केलेले असून ज्या ठिकाणी पायाचे ठसे आढळलेले आहेत त्या मार्गावर वेगळे पथक तपास करीत आहे. तसेच मानेगाव परिसरामध्ये दोन ठिकाणी दोन ट्रॅप कॅमेरे लावलेले असून अजून ट्रॅप कॅमेरे वाढविण्याच्या सूचना तसेच नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम तसेच याविषयी सूचना बॅनर तयार करण्याच्या सूचना आर एफ ओ यांना दिलेल्या असल्याचे जिल्हा वन अधिकारी श्री राम धोत्रे यांनी सांगितले. तसेच आज सोमवारी मुंबई येथे मंत्रालयामध्ये बैठक असल्याने या ठिकाणी गेलेलो होतो व मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव येथे बैठकीला गेलेल्या असल्याचेही श्री धोत्रे यांनी सांगितले.