![]() |
बोदवड येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेची जिल्हा बैठक संपन्न |
(अतिक खान | बोदवड)
बोदवड तालुक्यात ऑल इंडिया पॅंथर सेनेची जिल्हा बैठक उत्साहात पार पडली. जिल्हाध्यक्ष (पूर्व) लखन पानपाटील व जिल्हाध्यक्ष (पश्चिम) रोहन मेढे तसेच जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली.
बैठकीत भीम भिमस्टार चे अध्यक्ष दीपक इंगळे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोदवड तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर करून शेकडो कार्यकर्त्यांनी पॅंथर सेनेत प्रवेश केला.
यानंतर पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक दीपक भाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली महामानवांच्या विचारधारेवर आधारित मार्गदर्शन झाले. त्यांनी आपल्या चरवडीच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कार्यकारिणी उभारण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमात गोरगरिबांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्षांनी दिले. तसेच विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी यांच्या अडचणींवरही चर्चा करून तोडगे काढण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीमुळे बोदवड तालुक्यातील पॅंथर सेनेची ताकद अधिक भक्कम झाल्याचे दिसून आले.