![]() |
आई श्री क्षेत्र इच्छादेवी चरणी वडाचे तिसरे झाड अर्पण |
(अतिक खान, इच्छापूर मध्य प्रदेश)
मुक्ताईनगर (महाराष्ट्र) येथील मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी या सामाजिक सेवाधारी संस्थेमार्फत दरवर्षी नवरात्रीच्या काळात महा सायकल रॅलीचे आयोजन करून श्री क्षेत्र इच्छादेवी मंदिर, इच्छापूर (मध्य प्रदेश) येथे पायी व सायकलने भेट दिली जाते.
या रॅलीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी मुक्ताईनगरहून एक वडाचे झाड सोबत नेऊन इच्छादेवी ट्रस्टच्या सहकार्याने मंदिर परिसरात लावले जाते. त्या परंपरेप्रमाणे यावर्षीही सिव्हिल सोसायटीने तिसरे वडाचे झाड आई श्री क्षेत्र इच्छादेवी चरणी अर्पण केले.
पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि समाजहिताचा संकल्प घेऊन सोसायटीचे सदस्य सातत्याने हा उपक्रम राबवत आहेत. यामागचा उद्देश म्हणजे भाविक भक्तांचे तसेच शेतकरी जनतेचे आरोग्य चांगले राहावे, हंगाम सुखाचा जावा आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा हीच सदिच्छा.
या उपक्रमासाठी मामाश्री जैन ग्रुप सुखपूरी, इच्छापूर यांच्या वतीने विशेष सहकार्य देण्यात आले. त्यांनी यात्रेकरूंना फराळ, फळे, चहा व पाण्याची व्यवस्था करून अनमोल सेवा बजावली.