![]() |
मलकापूर व नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील ईले.पोलवरील विद्युत तारा चोरी गेल्या असून त्या तात्काळ बसवण्याची शिवसेना (उबाठा) ची कार्यकारी अभियंता यांना मागणी |
मलकापुर:-:मलकापुर व नांदुरा तालुक्यातील मोमिनाबाद, मेंढळी, जवळा, खैरा,बेलुरा, पिंपळखुटा बु!!, लासुरा सह आदि गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील खांब्यावरील विद्युत तारा चोरट्यांनी लंपास केल्यास असून त्या तारा तात्काळ बसवून देण्याची मागणी शिवसेना (उबाठा) माजी जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांचे नेतृत्वात शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व शेतकऱ्यांनी म.रा.वि.वि कार्यकारी अभियंता आर जि तायडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, मलकापूर व नांदुरा तालुक्यातील उपरोक्त गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील खांबावरील विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या असून शेतकऱ्यांना त्या तारा तात्काळ करुन लावून देण्यात याव्यात तसेच लासुरा येथील पुरुषोत्तम गारमोडे यांचे शेतातील तार झुकले आहेत, मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा, निमखेड, मोरखेड दाताळा या भागातील लाईट नेहमी ये- जा करते,शिवाजी ढोरे जिगाव यांना नवीन विद्युत कनेक्शन बाबत, मलकापुर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील हनुमान नगर बर्फ कारखान्याजवळील शंभर केव्हीची डीपी बदलून 200 के.व्ही ची करणेबाबत, अनुराबाद ता.मलकापूर येथील विश्वनाथ श्रीराम ढगे यांच्या बैलाचा ईले शाॅक लागून सन 2022 मध्ये बैल दगावला होता अद्याप ही त्या शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळाली नाही,वाकोडी,दुधलगाव ता.मलकापूर परीसरात लोखंडी पोल जमिनीपासून जीर्ण झाले आहेत ते बदलविणे बाबत, मलकापुर न.प हद्दीतील चिकारा प्लॉट मधील रस्त्याच्या मध्ये असलेले ईले.पोल हटविण्याबाबत आदी समस्यांचे निवेदन देण्यात आले असून या समस्या तात्काळ मार्गी लावण्याची निवेदनाद्वारे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे.निवेदनावर माजी जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, नांदुरा तालुकाप्रमुख ईश्वर पांडव, तालुकाप्रमुख दीपक चांभारे, शहरप्रमुख हरीदास गणबास, युवासेना तालुकाप्रमुख पवन गरुड, उपतालुकाप्रमुख राजेंद्र काजळे,विभाग प्रमुख गणेश सुशीर, चांद चव्हाण,महेंद्र डोफे, नितीन सोमस्कार, देविदास रत्नपारखी, प्रमोद खांदे, ज्ञानेश्वर डोफे, निखिल सुरडकर, अरुण नवथळे, वसंता गायकवाड, संजय डोफे, निवृत्ती कोल्हे, अक्षय खांदे सह शेतकरी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.