मलकापुर:-' तालुक्यातील ग्राम विवरा  येथे गत महिन्यात 26 सप्टेंबर 25 रोजी ढगफुटी होवून अतिवृष्टी  झाली त्यामध्ये शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांच्या घराचे अतोनात नुकसान झाले त्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पालकमंत्री सावकारे,आमदार  चैनसुख संचेती, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे,तहसीलदार राहुल तायडे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. मंत्री महोदयांनी विवरा येथील शेतकरी, रहिवासी ग्रामस्थांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला होता मात्र महिना उलटून सुद्धा  अद्यापही विवरा येथील शेतकऱ्यांना व रहिवासी ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने आज दि.31 ऑक्टोबर 25 रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना (उबाठा) चे वतीने तहसील कार्यालयासमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले, तसेच आठ दिवसात पैसे न मिळाल्यास यापेक्षा त्रीव आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत यांनी दिला या डफडे बजाओ आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख हरीदास गंणबास,उपशहर प्रमुख शकील जमादार, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी,अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम, विश्वनाथ पुरकर, दिपक कोथळकर,विभाग प्रमुख चांद चव्हाण, किसान सेना उपतालुकाप्रमुख गजानन मेंहेंगे,राजु नेवे,पद्माकर लांडे, बंडू पाटील, श्रीकृष्ण चोपडे, रघुनाथ सोनवणे, हरी तळेकर, मधुकर कडू, चंद्रभागा मोरे, कमल शिंदे, बाळू चोपडे, योगेश बिल, लहू सोनवणे, दिलीप वराडे, कैलास घुले, दामोदर पाटील, रमेश चौधरी, रहीम भाई बागवान,सह आदिंची उपस्थिती होती. डफडे बजाओ आंदोलनानंतर नायब तहसीलदार चौधरी यांना निवेदन देऊन आठ दिवसात अतीवृष्टी धारक शेतकरी व ग्रामस्थांना अनुदान देण्यात यावे अन्यथा या पेक्षा ही उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना(उबाठा) पदाधिकाऱ्यांनी दिला आहे
विवरा येथील अतिवृष्टीतांना अनुदान मिळण्यासाठी शिवसेना (उबाठा)चा तहसील कार्यालयासमोर डफडे बजाओ
By -
31.10.25
0
Tags:


