![]() |
मुक्ताईनगर शहरातील घरफोडी प्रकरणातील ३ आरोपी अटकेत. मुक्ताईनगर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन |
संदीप जोगी मुक्ताईनगर......
मुक्ताईनगर शहरात गेल्या सात व आठ ऑक्टोबर रोजी दिवसा व रात्री दोन घरफोडी व दोन वाहनांच्या चोऱ्या झाल्या होत्या त्यातील तिघांना अटक करून त्यातील चोरी गेलेली दोन वाहने, 94 हजार पाचशे रुपये चे सोन्या चांदीचे दागिने व दहा हजार रुपये रोख असा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे . दरम्यान आरोपी याना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान मुक्ताईनगर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मुक्ताईनगर शहरात गेल्या सात व आठ ऑक्टोबर रोजी दोन ठिकाणी आंबेडकर नगर व पंचायत समिती जवळ घरफोडी झाली होती तसेच घोडसगाव व मुक्ताईनगर येथून दोन मोटारसायकली चोरून नेल्या होत्या या संदर्भात गुप्त माहितीनुसार पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, हवालदार महेंद्र सुरवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय खंडेराव , पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र धनगर ,पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव ,पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वाडे अशा पथकाने तपासाची चक्रे फिरवून आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील व खामगाव तालुक्यातील अंबिकापुर येथून ताब्यात घेतले त्यांनी चोरीत वापरलेली चार चाकी डिझायर हे वाहन सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले असून न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्क रहावे अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी केले आहे दरम्यान पोलिसांच्या या कारवाईबद्दल तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
@@@
आरोपी प्रदीप हिवराळे (वय 30 वर्षे), अतुल हिवराळे (वय 30 वर्षे) , रवी हिवराळे (वय 40 वर्षे) राहणार अंबिकापुर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांना अटक करण्यात आलेली आहे.