कामगार न्यायालयाची अवहेलना करणाऱ्या मोरखेड ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करून कारवाई करण्याची शिवसेना (उबाठा) ची मागणी

Viral news live
By -
0
कामगार न्यायालयाची अवहेलना करणाऱ्या मोरखेड ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करून कारवाई करण्याची शिवसेना (उबाठा) ची  मागणी

ग्रामसेवकाचे पाच दिवसात निलंबन न केल्यास शुक्रवारी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांचा इशारा 

मलकापुर:- तालुक्यातील मोरखेड येथील ग्रामपंचायत कर्मचारी विजय नामदेव बंड यांना कामगार न्यायालयाने आदेशीत केल्याप्रमाणे कामावर रुजू करून  त्यांची थकीत रक्कम त्यांना 30 दिवसाच्या आत देण्याचा आदेश कामगार न्यायालयाने दि. 19 ऑगस्ट 25 रोजी दिला मात्र त्या न्यायालयाचे आदेशाला न जुमानता ग्रामसेवक सुधीर विनायक ढोले यांनी कामगार न्यायालयाची अवहेलना केली असून त्या ग्रामसेवकास पाच दिवसात निलंबित करून कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज गटविकास अधिकारी नारखेडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की विजय नामदेव बंड यांना न्यायालयाने कामावर रुजू करून घेण्याचे आदेश दिले व थकीत रक्कम देण्याची आदेशीत असताना थकीत रक्कम न मिळाल्याने आर्थिक विवंचनेपायी बंड यांच्या मुलीचे इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिक्षणाची दुसऱ्या वर्षांची फीस भरु न शकल्याने तिला शिक्षणापासून वंचित राहावे लागले तसेच बंड परिवाराची दिवाळी ही अंधारात गेली असल्याची माहिती त्यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिली होती त्या अनुषंगाने आज दि. 27 ऑक्टोबर 25 रोजी एका निवेदनाद्वारे ग्रामसेवक सुधीर विनायकराव ढोले याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी तसेच मोरखेड येथुन बदली झाली असून ही ढोले पदभार देण्यास टाळाटाळ करुन ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांना नाहक वेठीस धरत असून त्या ठिकाणी पर्यायी ग्रामसेवकाची तात्काळ नियुक्ती करुन पदभार देण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने शुक्रवार दि. 31 ऑक्टोंबर 25 रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना शहर प्रमुख हरिदास गणबास, उपशहरप्रमुख शकील जमादार,माजी नगरसेवक पांडुरंग चिम, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम सै. रहीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, किसान सेना उपतालुकाप्रमुख गजानन मेहेंगे, विभाग प्रमुख सत्तार शाह,दिलीप निकम,शे. मोहसीन शे. छोटू, जावेद खान सह आदींच्या सह्या नमूद आहेत.

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !