जळगाव जामोद प्रतिनिधी
तालुका शिवसेनेच्या वतीने दि. 25 ऑक्टोंबर रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला निवेदन सादर केले आहे दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहेकी तालुक्यातील अवैद्य देशी दारू वरली चा मटका तसेच विमल गुटखा आजूबाजूने शाळेतील मुले जात येत असतात हे अवैद्य धंदे भर रस्त्यावर सुरू आहे याची दखल घ्यावी तसेच जळगाव जामोद तालुक्यात सध्या स्थिती अवैद्य धदयांनी थैमान घातले आहे जसे की वरली मटका तीन पत्ती जुगार विमल गुटखा व अवैद्य दारू सोबतच गांजा तसेच अवैध्य रेती वाहतूक या तालुक्यात भरपूर प्रमाणात दिसून येत आहे या अवैद्य धदयांना पिंपळगाव काळे बीटचे अधिकारी पीएसआय अमोल पंडित यांचे अभय असल्याची चर्चा सध्या स्थिती तालुक्यातील नागरिक करीत आहेत अवैध्य धन्यांमुळे अनेक नागरिकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत तालुक्यातील अनेक गावातील महिलांनी या अगोदर पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळा निवेदन दिलेले आहे. गावातील अवैध्य दारू बंद करण्यात यावी मात्र पिंपळगाव काळे, आसलगाव या गावात भर रस्त्यावरअवेद्य दारू व विमल गुटखा विक्री होत आहे. जळगाव जामोद तालुक्यालगत मध्य प्रदेश सीमा असल्यामुळे मध्यप्रदेशातील विमल गुटखाची वाहतूक ही सर्रास चालू असते. विमल गुटखा सर्रासपाने किराणा दुकान व टपरिवर विकला जातो. तरी या सर्व प्रकारचे अवैद्य धंदे दि 2नोव्हेंबर पर्यंत बंद करण्यात यावे अन्यथा आपल्या पो. स्टे. समोर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सोबत महिला शिवसेना आघाडी यांच्यातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल कृपया याची दखल घेण्यात यावी अशा आशयचे निवेदन दिले दिलेल्या निवेदनाच्या प्रतिलिपी. मा.केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब,मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद,मा. एस पी कार्यालय बुलढाणा,मा. डी वाय एस पी कार्यालय खामगाव,मा.डी वाय एस पी कार्यालय मलकापूर दिलेल्या निवेदनावर शिवसेना नवनिर्वाचित तालुका प्रमुख संजय धुळे,उपजिल्हा प्रमुख देविदास घोपे, शहर प्रमुख संजय भुजबळ, मिर्झा बेग, विजय शीत्रे, दीपक तायडे, युवासेना तालुका प्रमुख अमोल दाभाडे, विभाग प्रमुख प्रदीप वानखडे,बाळू पाटील, गजाननराव देशमुख शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सौं. माधुरी राणे, तालुकाप्रमुख सौं.सविता ढगे उपतालुकाप्रमुख सौं. भारती ढगे, तालुका संघटक सौं वैशाली देशमुख, सौं शोभा चव्हाण, भारती परिहार, शाहिस्ता परवीन मेहमूद खान, प्रमिला राजपूत, यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

