हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या सरचिटणीसपदी यश ठोंबरे यांची निवड अहिल्यानगर नंदकुमार बगाडे पाटील याज कडून

Viral news live
By -
0
हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या सरचिटणीसपदी यश ठोंबरे यांची निवड अहिल्यानगर  नंदकुमार बगाडे पाटील याज कडून


(अतिक खान जळगांव)
श्रीरामपूर येथे शासकीय विश्रामगृहामध्ये हिंदू एकता आंदोलन पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे हे होते.

बैठकीदरम्यान शितोळे म्हणाले की, “हिंदू एकता आंदोलन पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात समाजहितासाठी कार्यरत आहे. आगामी काळात पक्षात युवकांना आणि महिलांना संधी देऊन संघटन अधिक बळकट करण्यात येणार आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “आगामी नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका हिंदू एकता आंदोलन पक्ष स्वबळावर लढवणार आहे. कोणत्याही पक्षाशी युती न करता आम्ही जनतेच्या विश्वासाने निवडणूक रिंगणात उतरणार आहोत.”

शितोळे यांनी पुढे सांगितले की, “शेतकऱ्यांचे अलीकडील पावसामुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन, राज्य सरकारने कोणतेही निकष न लावता तात्काळ नुकसानभरपाई द्यावी. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात येणार आहे.”

या बैठकीत अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीसपदी श्रीरामपूर येथील यश ठोंबरे यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या बैठकीस अहिल्यानगर जिल्हा सचिव नंदकुमार बगाडे पाटील, बी. एम. पवार, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव फोपसे, मनोहर बागुल तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन नंदकुमार बगाडे पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष मंगेश शेत्रवाणी यांनी मानले.

 या बैठकीत पक्ष संघटन विस्तार, आगामी निवडणुका आणि शासकीय योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !