भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा नागपूर हक्कयात्रा आंदोलनास जाहीर पाठिंबा

Viral News Live Buldhana
By -
0
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा नागपूर हक्कयात्रा आंदोलनास जाहीर पाठिंबा

उदयनगर: शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छिमार तसेच ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी माजी राज्यमंत्री मा. श्री. ओमप्रकाश (बच्चू) कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या ‘शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा व संपूर्ण कर्जमाफी आंदोलनास’ भारतीय शेतकरी कामगार पक्षाने आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
      या आंदोलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर आणि इतर कष्टकरी बांधव सहभागी होणार आहेत. ग्रामीण भागातील दिव्यांग, मेंढपाळ, मच्छिमार तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांनाही या हक्कयात्रेतून आवाज मिळणार आहे.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी पाठिंब्याचे पत्र पाठविताना पत्रात नमूद केले आहे की, “शेतकरी आणि वंचित समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू होणाऱ्या या हक्कयात्रा आंदोलनास आमचा पक्ष जाहीर पाठिंबा देत आहे. भ्रातृभाव आहेच, तो अधिक वृद्धिंगत होईल,” असा विश्वास जयंत पाटील यांनी या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !